spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तीर्थपुरीतील बनावट तूप प्रकरणात परवाना कायमचा रद्द होणार – मंत्री नरहरी झिरवाळ

– लॅब अहवालानंतर कायदेशीर कारवाई करणार 

मुंबई :- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेचा परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान तुपामध्ये खाद्यतेल व तुपाचा फ्लेवर असलेले इसेन्स मिसळून बनावट तूप तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. यावेळी एकूण आठ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

कारवाईदरम्यान पॅकबंद स्वरूपातील १,१२१.८ लिटर तूप, खुल्या स्वरूपातील ६६३.८ लिटर तूप आणि ११८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण १३.०४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

सध्या सर्व नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करून आस्थापना सील करण्यात आली असून, पुढील प्रक्रियेनंतर परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.