spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेक रेल्वे लाईन क्रॉसींग जवळ गहुहिवरा रोडवर जीवघेणे खड्डे

– खासदार बर्वे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबधित अधिका-यांना निर्देश

कन्हान :- खासदार श्यामकुमार बर्वे हयांनी रेल्वे लाईन क्रॉसींग जवळ गहुहिवरा रोड परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्था आणि निमखेडा येथील प्रलंबित रेल्वे उडाणपुल कामाची दक्षिण पूर्व मध्य रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली. आणि रेल्वे लाईन क्रॉसींग जवळ गहुहिवरा रोडवरवरील खड्डे व राधाकृष्ण नगर परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच निमखेडा रेल्वे उड्डाणपुल कामाला लवकरच गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

कन्हान वरून रामटेक कडे जाणा-या रेल्वे लाईन क्रॉसींग जवळील गहुहिवरा रोड राधाकृष्ण नगर येथे मोठ मोठे खड्डे पडले असुन त्यात पावसाचे पाणी साचुन खड्डे दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण देत येणा-या जाणा-या वाहनाचे अपघात होत असल्याच्या समस्येची रामटेक क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे यानी दखल घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (एमआरआय डीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लुडी ) यांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावुन कन्हान येथील रामटेक रेल्वे लाईन क्रॉसींग जवळील गहुहिवरा रोड वरील मोठ मोठे खड्डे तात्काळ भरून राधाकृष्ण नगर परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे तसेच नीमखेडा रेल्वे उड्डाणपुल कामासाठी आवश्यक सर्व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , मुख्याधिकारी दीपक घोडके, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (एमआरआय डीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लुडी ) अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्या नंतर प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात येणार असुन ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ पर्यंत निमखेडा रेल्वे उड्डाणपुल नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय कन्हान येथील रेल्वे क्रॉसींग जवळील गहुहिवरा रोड वरील खड्डे आणि राधाकृष्ण नगर परिसरात पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येचीही दखल घेण्यात आली. नागरिकांच्या मूलभुत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून विकास कामांना गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles