वेकोली व्दारे स्थानिकांची दिशाभूल,घरांचा योग्य मोबदला मिळवुन दया .
खासदार बर्वे यांना बजरंग दलाचे निवेदन.
टेकाडी १७ : – ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) अंतर्गत इंदर कॉलरी नंबर ६ वार्ड क्रमांक एक येथील स्थानिक राहिवासी वेकोली प्रशासनाचे चुकीचे धोरणाचे बळी ठरत आहेत. वेकोली द्वारा चुकीचे घराचे मोजमाप करून योग्य मोबदला आणि स्थानिकांना विश्वासात न घेता कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक हे दडपशाही करून वसाहत रिकामी करित असल्याने बजरंग दलाचे पारशिवनी तालुका संयोजक प्रविण कुमार कहार यांनी खासदार श्यामकुमार बर्वे हयांना निवेदन देऊन न्याय मिळवुन देण्याची मागणी केली आहे.
वेकोलि कामठी कॉलरी खुली कोळसा खदान चा विस्तार होत असल्याने ग्राम पंचायत टेकाडी (को. ख.) अंतर्गत इंदर कॉलरी नंबर ६ येथील गेली अनेक वर्षांपासुन असलेली रहिवासी वसाहत रिकामी कर ण्याचे काम वेकोली प्रशासना द्वारे सुरू केलेले आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता राजकीय वरदहस्त असलेल्याना जास्त मोबदला आणि इतरांना मोबदल्यात मिळणारी रक्कम देखिल वेकोलि प्रशास ना सांगत नसल्याने स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. उपक्षेत्रिय प्रबंधक यांनी स्थानिकांना मोबदला न देताच आधी घरे तोडा आणि मग मोबदला घ्या असे दडपशाहीचे धोरण राबवित आहे. वीज, पाण्याची पाईप लाईन कापुन मूलभुत सुविधांपासून वंचित कर ण्याचे काम देखिल वारंवार उपक्षेत्रिय प्रबंधक यांचे कडुन केले जातं असुन घरे रिकामी न केल्यास बुल डोजर चढवुन घरे तोडण्याची धमकी देखिल वेकोली अधिका-या व्दारे दिली जात आहे. वेकोलिच्या सर्वेक्ष ण विभागाकडू नियमबाह्य केलेला सर्वे हा स्थानिकांना मान्य नाही. वेकोलि द्वारे सर्वेक्षण दरम्यान अनेक नावे जाणीवपुर्वक गहाळ करण्यात आली. अश्या नानाविध समस्यांचे समाधान करून न्याय मिळवुन देण्याची मागणी रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देऊन केले आहे. याप्रसंगी खासदार बर्वे यांनी सीएमडी वेकोलि यांच्याकडुन समस्या सोडवुन देण्या चे आश्वस्थ केले. यावेळी बजरंग दल तालुका संयोज क प्रविण कुमार कहार यांचे सह सहसंयोजक पुष्कर सिंह, व्हिएचपी मंत्री अजित चौहान, ग्राम पंचायत सदस्य सतिश घारड, जयप्रकाश कुशवाह, अजित सिंग, सतिश चौहान, सागर मोरे, प्रविण चौहान, अशोक राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




