spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्याच्या६७ व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीता सोबत राज्य गीताचे सर्वांनी गायन केले.

यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल,सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे,निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles