नागपूर :- भारतीय इतिहासातील अजोड शौर्य, प्रखर स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या मेवाडचे महान योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती महावितरणच्या नागपूर परिमंडलात अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
‘विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित या विशेष कार्यक्रमात प्रभारी मुख्य अभियंता संजय वाकडे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि दिपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक समीर सिंघम आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या महान देशभक्ताच्या स्मृतींना उजाळा दिला. एका महान योद्ध्याच्या बलिदानाचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.



