विमानतळावर मोठी कारवाई : १९ कोटी ६५ लाखांचा गांजा जप्त, चौघांना अटक

0
60

 

मुंबई २९ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल १९ कोटी ६५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सीमा शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांत सलग दोन कारवाया केल्या. मंगळवारी बँकॉक येथून आलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांच्या बॅगमधून ११ किलो ६४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर बुधवारी फुकेत येथून आलेल्या दोन प्रवाशांवर संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. तपासात त्यांच्या जवळून ८ किलो गांजा आढळून आला.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण १९ कोटी ६५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चारही ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सीमा शुल्क विभागाकडून सुरू आहे.