spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक व्हावा

– मनपामधील अभिजात मराठी भाषा सप्ताह कार्यक्रमात साहित्यिक डॉ. कोमल ठाकरे यांचे प्रतिपादन

नागपूर :- मराठी भाषेला चिरंतन मूल्य असून, या भाषेचा वापर शासकीय व्यवहार व संवादासाठी अधिकाधिक होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत वर्षाचे औचित्यसाधून अभिजात मराठी भाषा सप्ताह अंतगर्त अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त शुक्रवारी (ता.३) नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात कार्यक्रम पार पडला. ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त  विजया बनकर, अधीक्षक अभियंता लिना उपाध्याय, शिक्षणाधिकारी साधना सयाम, सहायक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.

शासकीय कामकाजात मराठी भाषेचा दर्जेदार उपयोग या विषयावर डॉ. ठाकरे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ. कोमल ठाकरे यांनी मराठी भाषेच्या वैभवशाली इतिहासाचा धांडोळा घेतला. डॉ. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेने मराठी भाषेला एक सर्वोत्कृष्ट भाषा करण्यात मोलाचा वाटा उचलला. संत ज्ञानेश्वरांनी या भाषेला अमृताहून गोड असल्याचे म्हटले आहे. अशा या दर्जेदार भाषेचा वापर कार्यालयीन कामकाजासोबत दुसऱ्यांशी संवाद करताना अधिकाधिक केल्यास मराठी भाषा चिरंतन राहण्यास व समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी महानगरपालिकेचा मानाचा दुपट्टा, तुळशीचे रोपटे व महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेले सन्मान चिन्ह देऊन डॉ. ठाकरे यांचा सत्कार केला. अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे तुळशीचे रोपटे देऊन शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी स्वागत केले तर अतिरिक्त आयुक्त विजय बनकर यांचे स्वागत सहाय्यक आयुक्त श्याम कापसे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी मानले.

Popular Articles