spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामपंचायतींना मुकाअ यांची धडक भेट

– दप्तर तपासणी : मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानावर भर

यासीन शेख, गोंदिया :- मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी देवरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत सावली व डोंगरगाव येथे भेट देवून कार्यालयीन दप्तर तपासणी केली.

संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचातींचा देखील या अभियानात समावेश असून अभियानांतर्गत प्रगती पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी यांनी ग्रामपंचायतींच्या तपासणीच्या धडक मोहीमेला सुरुवात केली आहे.

यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे,nदेवरीचे गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे यावेळी उपस्थित होते. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करून ग्रामपंचायतींच्या रेकॉर्ड ची देखील मुकाअ यांनी पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेला देखील मुकाअ मुरूगानंथम यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक विकासाबद्दल माहीती घेतली. मुकाअ यांच्या प्रश्नोत्तरात विद्यार्थी देखील चांगलेच रमले होते. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान ग्रामपंचायतींच्या संबंध विकासावर भर देते. लोकसहभागासह लोकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यावर अभियानाचे गुणांकन आहे. विशेष म्हणजे, या अभियानात ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर मिळून सुमारे सहा कोटी ६५ लक्ष पर्यंतचे पुरस्कार मिळण्याची संधी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या गुणांकनाकडे लक्ष द्यावे, आपली ग्रामपंचायत अधिकाधिक लोकाभिमूख आणि समृध्द करण्यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी दिले. दरम्यान उपमुकाअ मधुकर वासनिक यांनी प्रश्नावली ची माहीती घेवून आवश्यक निर्देश दिले. दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.