नागपूर, ता. १४ : केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यात विशेष म्हणजे पी.एम. ई-बस योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळणार असून, या योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बस नागपूर शहरात मध्ये ट्रायलसाठी आली आहे. या बसची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी ( ता.१४ जुले) मनपा मुख्यालय येथे पाहणी केली. पाहणी दरम्यान मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अत्याधुनिक विद्युत बसच्या पाहणी नंतर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी काही महत्त्वाच्या सूचना जेबीएम कंपनीच्या प्रतिनिधी यांना दिल्या. पी.एम. ई-बस योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या या बस पुढील तीन दिवस नागपूर शहरात मार्गक्रमण करणात आहे.
शहरबस वाहतुकीच्या वाढीला प्रोत्साहन व समर्थन देण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत पी.एम.ई बस सेवा योजना देशाअंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये नागपूर शहराकरिता १५० ई-बसेस प्राप्त होणार आहेत. या सोबतच खापरी डेपो आणि कोराडी डेपो या दोन्ही डेपोचा विकास देखील मुलभुत सुविधेअंतर्गत करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून महावितरण अंतर्गत एचटी अँड एलटी इलेक्ट्रीक जोडणी करीता तथा स्थापत्य विषयक कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उपरोक्त दोन्ही डेपो पैकी कोराडी डेपो तयार झाले असून खापरी डेपोचे काम सध्या सुरु आहे. दोन्ही डेपो मध्ये प्रत्येकी ७५ बसेसच्या चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पाहणीदरम्यान केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्लीचे डेप्यूटी टिम लिडर राम पौनिकर, सीआईआरटीचे तांत्रिक प्रमुख शेखर ढोले, जेबीएम चे भारत भूषण चावला, कुलदीप गांगुर्डे, मनपाच्या परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव यांच्यासह उपअभियंता केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, राजस्व निरीक्षक समिर परमार उपस्थित होते.
असे आहे बसचे वैशिष्ट्य
बसची लांबी ९ मीटर
पर्यावरण पूरक वातानुकूलित ई बस
फास्ट चार्जिंगची सोय
दिव्यांगांसाठी विशेष हायड्रॉलिक ई – रॅम्प
२५ नागरीकांसाठी बसण्याची व्यवस्था
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ सीसीटीव्ही
चार ठिकाणी डिस्प्ले




