spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोतीबाग येथील नाल्याची मनपा आयुक्तांकडून पाहणी

– नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे महारेलला निर्देश

नागपूर :- मनपाच्या नालेसफाई अभियानांतर्गत मोमीनपुरा ते मोतीबाग पर्यंतच्या नाल्याची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता. 25) पाहणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाल्याची साफसफाई करून रुंदीकरण आणि खोलीकरणासह इतर आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी आशीनगर झोन सभापती आसिफ शेख, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त राजेश भगत, गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता निलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी  भोला खोब्रागडे, सुरेश खरे, महारेलचे सुशील कुमार शर्मा, विजय उदापुरे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोमीनपुरा ते मोतीबाग दरम्यान हा नाला आहे. पासाळ्यात नाल्यातील पाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये जात असल्याने स्थानिक नागरिक आणि नगरसेवक यांनी या भागात भेट देण्याची विनंती मनपा आयुक्त यांना केली होती. त्याअनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मोतीबाग नाल्याची पाहणी केली. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या नाल्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील सर्व कामे, नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व आरसीसी प्री-कास्ट बॉक्स बसविण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे महारेलच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासोबतच नाल्यावरील व रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. तसेच ही कामे करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Popular Articles