spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदे तर्फे शहरातील नागरिकांच्या पावसाळ्यापूर्वीच्या विविध समस्याचे आयुक्तांना निवेदन

नागपूर :- भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषद तर्फे नागपूर शहरातील नागरिकांच्या पावसाळ्यापूर्वीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 25 मे रोजी नागपूर महानगर पालिका आयुक्त महोदय डॉ. विपिन इटनकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये शहरातील नाले सफाई, गटार स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, पाणी तुंबणाऱ्या भागांची ततडीने पाहणी, डेंग्यू- मलेरिया प्रतिबंधक फवारणी, धोकादायक झाडांची छाटणी तसेच बंद स्ट्रीट लाईट दुरुस्ती यांसारख्या कामांची मागणी करण्यात आली.

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली. यावेळी परिषदे चे राजेश रंगारी, सुरेश गेडाम, राजीव अंबादे, अनिकेत रंगारी, राधेश्याम राजपूत, भिमराव सहारे, यशवंत कावरे, अब्दुल कादीर, बाला राघोर्ते, महेंद्र जीवने सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles