spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वच्छ सर्वेक्षण वर मनपा आयुक्तांची  प्रतिक्रिया

नागपूर १८ : स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर या गटात यावर्षी २७ वा क्रमांक (रँक) प्राप्त झाला आहे.  यावर्षी मनपाला एकूण १२५०० पैकी ९३२८ गुण प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नागपूरला ९५००  पैकी ६१६४  गुण मिळाले होते.म्हणजेच एकूण गुणांची टक्केवारी ६४.८ टक्के होती. या तुलनेत, या वर्षी नागपूरने १२५०० पैकी ९३२८ गुण मिळवून आपली टक्केवारी ७४.६ टक्के पर्यंत वाढवली आहे.गेल्या वर्षीही मनपाला २७ वा क्रमांक प्राप्त झाला होता. स्वच्छ सर्वेक्षणाच्या काही मापदंडांमध्ये शहराचे प्रदर्शन लक्षणीयरित्या सुधारलेले आहे.
मनपामार्फत वेगवेगळे प्रकल्प जसे सी अँड डी वेस्ट, कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्रकल्प, बायोमायनिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे.
मनपाद्वारे शहरातील स्वच्छतेवर भर देण्याकरिता विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. एक तारीख एक तास, आर आर आर सेंटर,  स्वच्छ मोहल्ला स्पर्धा, स्वच्छ बाजारपेठ, इको ब्रिक्स यासोबतच शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. या संपूर्ण उपक्रमांना नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनपा भविष्यात अधिक प्रयत्न करून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नागपूरचा रँक वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहणार आहे.
– डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त तथा प्रशासक, मनपा नागपूर

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.