spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाचे दिव्यांग सर्वेक्षण अंतिम टप्प्यात.

शहरातील दहाही झोनमध्ये उत्तम प्रतिसाद  
नागपूर, ०३  : नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलीत करण्यासाठी दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले. महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून मनपाच्या आशा सेविकांद्वारे सुरू असलेले सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून त्याला नागपूरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी मनपाच्या आशा सेविकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात मनपाच्या आशा सेविकांमार्फत 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाची ओळख करून घेण्यासाठी दहाही झोनमध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे. याकरिता आशा सेविकांना 2 ते 11 एप्रिल 2025 दरम्यान प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
दिव्यांगांच्या सर्वेक्षणामुळे पुढील काळात दिव्यांगांच्या उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होणार आहे. अनेक दिव्यांग माहितीअभावी व कागदपत्रांच्या अभावी योजनांपासून वंचित राहतात. या सर्व कल्याणकारी योजनांचा दिव्यांगां लाभ पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण करताना दिव्यांगत्वाचे प्रकार, त्यांचे यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड तसेच इतर माहिती देखील घेतली जात आहे. ज्यामुळे पुढील काळात त्याची पूर्तता करुन त्यांना योजनांपासून लाभान्वित करण्यात येईल.
नागपूर शहरांमधील काही भाग वगळता सामान्यजन, मध्यमवर्गीय यांच्यामध्ये दिव्यांग सर्वेक्षणाच्या बाबतीत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मात्र उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आशा सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंतिम टप्प्यातील वस्तुनिष्ठ दिव्यांग सर्वेक्षणासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य दर्शवावे व आपल्या घरातील दिव्यांगाची नोंद करून घ्यावी. जेणेकरून, एकही दिव्यांगजन कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये, ही नैतिक जबाबदारी समजून सहकार्य करावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात येत आहे.
*दिव्यांगत्वाचे २१ प्रकार*
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्वाचे एकूण २१ प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, ते पुढीलप्रमाणे :
१. दृष्टीदोष (Visual Impairment
२. ⁠श्रवणदोष (Hearing Impairment)
३. ⁠बोलण्यात अडचण (Speech Impairment)
४. ⁠शारीरिक अपंगत्व (Locomotor Disability)
५. ⁠मानसिक आजार (Mental Illness)
६. ⁠बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability)
७. ⁠स्वमग्नता / आत्मकेंद्री विकार (Autism Spectrum Disorder)
८. ⁠सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy)
९. ⁠बहुविकलांगता (Multiple Disabilities)
१०. ⁠डीएसएलडी – भाषा आणि बोलण्याचा विकासात उशीर (Developmental Speech and Language Disorder)
११. ⁠शिक्षण विकार (Specific Learning Disabilities – Dyslexia, etc.)
१२. ⁠मायोपिया / दृष्टिदोष (Low Vision / Myopia)
१३. ⁠अपस्मार / फिट्स (Epilepsy)
१४. ⁠मांसपेशींचा आजार (Muscular Dystrophy)
१५. ⁠हाडांचा विकार (Skeletal Dysplasia)
१६. ⁠मुलांची वाढ खुंटणे (Dwarfism)
१७. ⁠जैविक दोष (Neurological Disorder)
१८. ⁠थॅलेसेमिया (Thalassemia)
१९. ⁠हेमोफिलिया (Hemophilia)
२०. ⁠सिकल सेल आजार (Sickle Cell Disease)
२१. ⁠बहिःप्रेरित अपंगत्व (Acid Attack Victim)


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.