spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वच्छ सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी मनपाचा पुढाकार

– एक तारीख, एक तास एक साथ’द्वारे विविध ठिकाणी श्रमदान

नागपूर :- मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी पुढाकार घेत महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.१) ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत ‘हर महिने की शुरुवात सफाई के साथ’ संकल्पनेनुसार ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे, ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता करण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे मनपाच्या दहाही झोन मध्ये स्वच्छता करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ येथील दीक्षाभूमी परिसर, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १५ येथील कॅनल रोड पंचशील चौक ते अलंकार रोड, हनुमान नगर झोनमधील प्रभाग क्रमांक ३४ येथील ओंकारनगर पाणी टाकीजवळ, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक १७ येथील भुरा मैदान, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक २८ येथील गोल्डन टेम्पल गोसिया कॉलनी, गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १६ येथील सीपी एन्ड बेरार महाविद्यालय ते मेहंदी लेन महाल, सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक २० येथील १८० सदन इतवारी रेल्वे स्टेशन जवळ, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक २४ येथील मिनिमाता नगर, आशीनगर झोन मधील प्रभाग ६ येथील दयानंद मैदान वैशाली नगर, मंगळवारी झोन मधील प्रभाग ९ येथील इंदोरा भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नागरिकांनी देखील स्वच्छतेच्या कार्यात सहकार्य केले.

Popular Articles