spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महिला सक्षमीकरणासाठी मनपाचे पाऊल निरुपयोगी फुलांपासून वस्तू निर्मिती क्लस्टर तयार करण्याचा मानस

नागपूर, ता.१५ : नागपूर महानगरपालिकाचा महिला बचत गटाच्या बळकटीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्न आहे. शहरात निर्माण होणाऱ्या निरुपयोगी फुलांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध उपयुक्त वस्तू उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. यांनी मंगळवारी (ता.१५) सीताबर्डी येथील नेताजी फुल मार्केट येथे भेट दिली. निरुपयोगी फुलांपासून वस्तू निर्मिती करून महिला बचत गटांचे क्लस्टर तयार करण्याचा मनपाचा मानस आहे. या उपक्रमामुळे फुलांच्या कचऱ्याची समस्या कमी होऊन त्यातून नवे व्यवसाय आणि पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाईल.

याप्रसंगी मनपाच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, समाज कल्याण विभागाचे विनय त्रिलोकवार आणि फ्लाईट इन्स्टिट्यूटच्या  कविता डंभारे यांच्यासह इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. यांनी फुल विक्रेत्यांशी सविस्तर चर्चा केली. मार्केटमधून दररोज किती प्रमाणात फुले वाया जातात, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. या निरुपयोगी फुलांवर प्रक्रिया करून त्यापासून गुलकंद, अगरबत्ती, धूपबत्ती, अत्तर, सुगंधित द्रव्ये, रुम फ्रेशनर, नैसर्गिक रंग यांसारखी विविध उत्पादने तयार करण्याची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. यामुळे फुलांच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होईल आणि त्यातून आर्थिक उत्पन्न ही मिळू शकेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे शहरातील फुलांच्या कचऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होईलच, याशिवाय बचत गटांतील महिलांना  रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील अशी  अपेक्षा आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.