spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजपासून फुलांसह रोषणाईने उजळणार मनपाची उद्याने

-‘पुष्पोत्सव २०२६’ चा प्रारंभ

– नववर्षाच्या स्वागतासाठी ४ जानेवारीपर्यत फुलांचा महोत्सव

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या रंग, सुगंध आणि सौंदर्याचा महोत्सव असणाऱ्या ‘पुष्पोत्सव २०२६’ ला गुरूवार १ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ‘पुष्पोत्सव २०२६’ अंतर्गत मनपाचे दहा उद्याने सुगंधित पुष्पांनी आणि आकर्षक सौंदर्यीकरणानी बहरणार आहेत. तसेच दहाही उद्याने आकर्षक रोषणाईने उजळणार आहे. विशेष म्हणजे,मनपाच्या पुष्पोत्सव प्रदर्शनाचे हे तिसरे वर्षे आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात उद्यान संवर्धक अमोल चौरपगार यांच्यासह संपूर्ण उद्यान विभाग पुष्पोत्सव २०२६ साठी तत्परतेने कार्यरत आहे. मनपाच्या विद्युत विभागाद्वारे दहाही उद्याने आकर्षक रोषणाईने उजळण्यात आली आहे. गुरूवार १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शहरातील दहा उद्यानांमध्ये उद्यानांच्या रोजच्या वेळेनुसार नागरिकांना या उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये १३ प्रकारचे शेवंती,रेम्बो, बोगनवेलिया, सुगंधी असून रंगीबेरंगी फुले, आकर्षक पुष्परचना व यांचा सुरेख संगम या उत्सवात अनुभवता येणार आहे. तसेच या पुष्पोत्सवामध्ये टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर करून फुलांची व सजावटीची रचना करण्यात येत असून सेल्फी पॉईंट्स, कृत्रिम धबधबाची उभारणी केली आहे. ‘वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेवर आधारित सजावट, पुनर्वापरयोग्य साहित्य, पर्यावरणस्नेही घटकांचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला जाणार आहे.

झोननिहाय उद्यानांचे ठिकाण व थीम पुढीलप्रमाणे –

लक्ष्मी नगर झोन – १) : सुर्वेनगर उद्यान- शेवंती थीम

धरमपेठ झोन – २ : शिवाजीनगर उद्यान- रेम्बो थीम

हनुमान नगर झोन – ३ : त्रिशताब्दी उद्यान- बोगनवेलिया थीम

धंतोली झोन – ४ : महात्मा फुले उद्यान, सुयोगनगर-पिटूनिया थीम

नेहरू नगर झोन – ५ : संत ज्ञानेश्वर उद्यान, दत्तात्रयनगर- सुगंधी थीम

गांधी महाल झोन – ६ : गांधीबाग उद्यान- स्वच्छता थीम

सतरंजीपुरा झोन – ७ : तुळशीनगर उद्यान- मेसज इन Flower

लकडगंज झोन – ८ : लता मंगेशकर उद्यान- मिक्स Flower थीम

आशी नगर झोन – ९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशालीनगर- रोझ थीम

मंगळवारी झोन – १० : मंगळवारी उद्यान- Cactus & Bonsia थीम


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.