spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दीक्षाभूमी परिसराच्या स्वच्छतेसाठी मनपाची यंत्रणा कार्यरत

नागपूर :- ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर दीक्षाभूमी परिसराची साफसफाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची यंत्रणा या परिसराच्या स्वच्छता करत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत.

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायांचे नागपुरात ३० सप्टेंबरपासून आगमन सुरू झाले होते. या अनुयायांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात काम सुरू होते. या सर्व कामावर नियंत्रण व समन्वय साधण्यासाठी महापालिकेने विशेष नियंत्रण कक्ष स्थान केला होता. यावेळी मनपाचे अधिकारी-कर्मचारी यांनी अहोरात्र सेवा दिल्याने दीक्षाभूमीवरील महत्वपूर्ण सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. अनुयायांनी महानगरपालिकेने घेतलेल्या कामाची प्रशंसा केली.

२ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा संपल्यानंतर अनुयायी परतीच्या मार्गावर आहेत. यानंतर नागरिकांना काही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी आघाडी सांभाळून साफसफाई करण्यास सुरूवात केली. दीक्षाभूमी परिसर शिवाय माताकचेरी, शासकीय आयटीआय, सामाजिक न्याय भवन, कुर्वेज हायस्कूल, अंबाझरी तलाव, व कारागृह परिसरात अनुयायांसाठी नागरी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. हा परिसर पुन्हा पूर्ववत करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी साफसफाईचा मोर्चा सांभाळला. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र दीक्षाभूमी आतील परिसर तसेच, रस्ते, फुटपाथ सफाई करण्यात येत होते. त्याकरिता 650 सफाई कर्मचारी यांनी नियुक्ती करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मदतीला सफाई करण्याकरिता लहान मोठ्या अशा 42 गाड्या लावण्यात आल्या. याशिवाय दीक्षाभूमी येथे आलेल्या अनुयायांना रीतसर कचरा पेटीत कचरा टाकण्यात यावा याकरिता 200 कचऱ्याच्या पेट्यांची व्यवस्था केली गेली. मनपाचे कर्मचारी उपद्रव शोध पथक अनुयायांना मार्गदर्शन करीत होते. रात्रि त्यांच्या विश्रांतीसाठी निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.

शिवाय सफाईवर लक्ष ठेवण्याकरिता ४ सक्शन कम जेटींग मशीनद्वारे शौचालयाची सफाई रात्र दिवस केली जात होती. महापालिकेने केलेल्या साफसफाईबद्दल अनेक अनुयायांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले.

मनपाद्वारे दीक्षाभूमी परिसरालगतच्या रस्त्यावर १२० नळा द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली गेली. याशिवाय रेल्वे स्टेशन, बस स्टॅड, शहरातील विविध परिसर आणि ड्रॅगन पॅलेस, दीक्षाभूमी येथे जाण्याकरिता बस सेवा, विश्रांतीकरिता निवारा केंद्र उपलब्ध करून दिल्याने अनुयायांनी चांगलेच सुखावले. त्यांनी मनपाच्या कामाची चौफेर प्रशंसा केली. दीक्षाभूमीवर व्यवस्था उत्तम राहण्याकरिता मनपाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.