नागपूर :- सुधार प्रन्यास कर्मचारी वेलफेयर असोसिएशन च्या वतीने ७ व ८ मार्च रोजी वेलफेयरच्या सांस्कृतिक सभागृहात स्नेहसंमेलन तसेच महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन ना.सु.प्र. चे विश्वस्त संदीप इटकेलवार याचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ना.सु.प्र. च्या कार्यकारी अधिकारी रसिका कवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनात फॅन्सी ड्रेस, नृत्य, संगीत अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी वेलफेयर असोसिएशन द्वारे कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकरिता २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख विद्यालय पटांगणात विविध क्रीडाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन ना.सु.प्र. चे अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर यांचे हस्ते पार पडले. या स्पर्धेत क्रिकेट, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, गोळा फेक इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वेलफेयर द्वारे ८ मार्च रोजी ना.सु.प्र. मध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांतर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. या शुभदिनी महिलांचे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन कर्मचारी वेलफेयर संस्थेचे अध्यक्ष दिलीप हटवार, सचिव राजन परकाळे, कोषाध्यक्ष राजेश काथवटे, मनोहर पाटील, हरीश मेश्राम, सतीश भुरले, सारनाथ गेडाम, लोभेश बोबडे, जागृती झोडे, काठोळे, गोसावी इत्यादी पदाधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक राजेश समरीत, हुजुरदास माहुले, स्नेहा शेळके, शंकर बाबरे, सविता मेश्राम, पौर्णिमा कान्हेकर, प्रभाकर देवके यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक ना.सु.प्र. पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद नाईक यांनी तर आभार लोभेश बोबडे यांनी मानले.
Home Latest News नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी वेलफेयर असोसिएशन तर्फे स्नेहसंमेलन आणि महिलादिन मोठ्या उत्साहात



