spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्रमदान करीत नागपूरकरांनी दिला स्वच्छतेचा संदेश

-‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत दहाही झोन मध्ये ‘एक दिन एक घंटा एक साथ श्रमदान’

नागपूर :- केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे गुरुवारी (ता.२५) सकाळी एक दिन एक घंटा एक साथ उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत मनपाच्या दहाही झोन मध्ये विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले. उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागपूरकरांनी श्रमदान केले. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या फुटाळा तलाव परिसरात श्रमदान करीत स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूरसाठी मनपा कार्यरत असल्याची भावना वृद्धिंगत केली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेद्वारा ‘स्वच्छोत्सव’ या संकल्पनेस अनुसरून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाचे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी मनपाच्या दहाही झोन मध्ये एक दिन एक घंटा एक साथ श्रमदान करण्यात आले.

श्रमदानाची सुरुवात धरमपेठ झोन येथील फुटाळा तलाव परिसरात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमन पंत यांनी केली. यावेळी त्यांनी स्वतः परिसराची स्वच्छता केली. यावेळी मार्गदर्शन करीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी स्वच्छतेकरिता सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत स्वच्छता ही आपण सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घराजवळचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेल्या मनपा अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, मनपाचे स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि स्थानिक नागरिकांचे आभार सुद्धा मानले.

यावेळी श्रमदान कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आणि धरपमेठ झोनचे सहायक आयुक्त  राजकुमार मेश्राम, विभागीय झोनल अधिकारी लोकेश बासनवार, धरमपेठ झोनचे झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर आणि मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चटर्जी, मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर व तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे स्वयंसवेक सुरभी जैयस्वाल, मेहुल कोसुरकर, प्राची यादव, विष्णुदेव यादव, तुषार देशमुख, पार्थ जुमडे, प्रतिक इसमपल्लीवार, रोटरी क्लब ऑफ वायसीसीईचे विद्यार्थी, एजी एनव्हायरोचे ऑपरेशन मॅनेजर प्रवीण चव्हाण तसेच स्थानिक नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी परिसर, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या जुनी शुक्रवारी, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या भगवाननगर, मेन रोड आणि ओमकार नगर चौक, नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या गुरुदेवनगर मेन रोड, गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या कोठी रोड, नवयुग स्कूल परिसर, सतरंजीपूरा झोन अंतर्गत येणाऱ्या इंदर कारखाना मेन रोड, लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या हिरवीनगर यूपीएससी हेल्थ यूनिट ग्राऊड, आशीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या गुरुनानकपुरा, मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या शाहू आटा चक्की येथे सखाले स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेसाठी दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते. यामध्ये लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, हनुमानगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, नेहरुनगर झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, लकडगंज झोनेच सहायक आयुक्त विजय थूल, अशीनगर झोनेच सहायक आयुक्त हरीष राऊत, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक गराटे, यांच्यासह लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी ऋषिकेश इंगळे, हनुमाननगर झोनचे झोनल अधिकारी दिनेश कलोडे, धंतोली झोनचे झोनल अधिकारी राजेश गायधनी, नेहरुनगर झोनचे झोनल अधिकारी विठोबा रामटेके, गांधीबाग झोनेच झोनल अधिकारी सुरेश खरे, सतरंजीपुरा झोनचे झोनल अधिकारी वामन कयाळकर, लकडगंजचे झोनल अधिकारी मंगेश राऊत, अशीनगर झोनचे झोनल अधिकारी सुनील तांबे, मंगळवारी झोनचे झोनल अधिकारी प्रमोद आत्राम यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.