spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

युनिटी रन’ मधून नागपूरकर देणार राष्ट्रीय एकतेचा संदेश 

– येत्या ३१ ऑक्टोबर रोजी भव्य आयोजन

नागपूर :- देशाचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने युनिटी रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सरदार वल्लभभाई पटेल कच्छीविसा मैदान, वर्धमान नगर येथून करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांच्या या स्पर्धेतील सहभागातून एकतेचा संदेश देण्याचा यामागील उद्देश असून, मोठ्या संख्येत नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाच्या क्रीडा विभागाद्वारे करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने मनपाद्वारे युनिटी रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत १० कि.मी. पुरुष खुला गट, ५ कि.मी. महिला खुला गट, ५ कि.मी. मुले -१६ वर्षांखालील मुले, ३ कि.मी. मुली-१६ वर्षांखालील मुले तसेच इतर सर्वांसाठी २.५ कि.मी. युनिटी रन यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार आहे. यात एकूण ३ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून, वेशभूषा स्पर्धा (फॅन्सी ड्रेस) सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे, प्रथम ५ हजार धावपटूंना पदके आणि सर्व नोंदणीकृत धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मनपाद्वारे https://unity-run.emergent.host/ संकेतस्थळ व क्यूआर कोडवर उपलब्ध करून दिला आहे, इच्छुकांनी आपली येत्या २९ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करावी, नोंदणीकृत स्पर्धकांना ३० ऑक्टोबर रोजी टी-शर्ट्स आणि चेस्ट क्रमांक प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘युनिटी रन’ला यशस्वी करावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Popular Articles