spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा नगर परिषद गटनेते पदावर नामदेव गजभिये, तर प्रतोद पदावर आशिष ढाले यांची निवड, उपाध्यक्ष पदासाठी होणार घमासान

खापा :- नगर परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसा आगोदर पार पडुन निकाल जाहीर झाले. यात भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षसह ९ उमेदवार विजयी झाले, तसेच काँग्रेस पक्षाचे १० उमेदवारांनी बहुताने विजय मिळवला. तर एक उमेदवार अपक्ष निवडून आले.

काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक नामदेव हेमाजी गजभिये यांची नगर परिषद गटनेता तर प्रतोद पदावर नगरसेवक आशिष ढाले यांची निवड करण्यात आली. ही निवड माजी मंत्री सुनिल केदार यांच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, सावनेरचे सभापती रविंद्र चिखले, पंचायत समिती सावनेरचे माजी उपसभापती प्रकाश पराते यांनी जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याकडे पत्र दिले. या निवडीमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

गटनेते पदी निवड झालेले नामदेव गजभिये व प्रतोद पदावर निवड झालेले आशिष ढाले हे नेहमी गोर गरीबांच्या संपर्कात राहुन लोकांचे काम करणारे, युवा वर्गात चांगली पकड असलेल्या युवा नेतृत्वाचे गटनेते व प्रतोद पदी निवड झाल्याने नागरिकांकडून शुभेच्छा देत, सर्वस्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

यावेळी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक गणेश आके, मिलिंद बुरडे, संजय सोनकुसळे, नगरसेविका प्रेमिला (बोकडे) भुते, मनोरमा श्रियाम, कविता धराडे, लिला बागडे, वैशाली लाड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अखिल लाड, अंकित मुंगोले, स्वप्निल धराडे, संदीप गिरपुंजे, कमलेश बागडे, प्रकाश भुते आदी उपस्थितीत होते.

“उपाध्यक्ष पदासाठी होणार घमासान”

अपक्ष उमेदवार हे भाजपसोबत गेल्याने काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे दहा दहा नगरसेवक झाले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदाची निवड ही अतिशय चुरशीची दिसत आहे, आणि सर्व नागरिकांचे याकडे बारकाईने लक्ष लागलेले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.