spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“पोलीस रेझिंग डे” निमित्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, स्टूडेंट पोलीस कॅडेटचे आयोजन

खापा :- महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे पोलीस स्थापना दिवस सप्ताह राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने शहरातील स्थानिक पी. एम. श्री. नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथे (दि.५) रोजी पोलिस रेझिंग डे निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जगदिश पालीवाल, पोलिस गुप्त विभाग नितेश चिपडे यांनी वाहतूक नियम, विनापरवाना गाडी चालवू नये, मोबाईलचे दुष्परिणाम, सायबर क्राईम, समाजात घडणारे विविध गुन्हे, नायलाॅन मांजा न वापरणे, गुड टच बॅड टच यासारख्या विविध विषयांवर शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन स्टूडेंट पोलीस कॅडेट (SPC) ग्रुप तर्फे करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, शामराव खडसे स्टूडेंट पोलीस कॅडेट (SPC) ग्रुपचे समन्वयक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Popular Articles