spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहाडी तालुक्यात रेतीघाट सुरू

हंसराज प्रतिनिधी, भंडारा मोहाडी :- शासन निर्णय दिनांक 30/04/2025 अन्वये जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मोहाडी तालुक्यातील बेटाळा, शिवराळा, मुंडी बुज, रोहा, निलज बुज, देव्हाडा बुज आदी एकूण सहा रेतीघाटांमधून रेती उत्खनन व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडून दिनांक 05/12/2025 रोजी प्राप्त आदेशानुसार मोहाडी तालुक्यात रेतीघाट सुरू करण्यात आले आहेत. पंचायत समिती मोहाडी यांच्याकडून घरकुल लाभार्थ्यांची आधार व मोबाईल क्रमांकासह यादी प्राप्त झाली असून अनेक लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीही केली आहे.

मात्र प्राप्त लाभार्थी यादीत काही ठिकाणी आधार व मोबाईल क्रमांकात त्रुटी आढळून आल्याने, अशा लाभार्थ्यांना रेती उचल करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत संबंधित लाभार्थ्यांना रेतीघाटावरून रेती उचल थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंचायत समिती मोहाडी यांच्याकडून सुधारित व अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर रेतीघाटांमधून पुन्हा रेती उचल सुरू करण्यात येईल, असे तहसीलदार, मोहाडी यांनी स्पष्ट केले आहे.

Popular Articles