नारायणा गुरु जयंती संपन्न  बसपा कडे बाबासाहेबांचा हत्ती व निळा झेंडा आहे : उत्तम शेवडे

0
160
नागपूर २८ : दक्षिण भारतातील प्रसिद्ध समाज क्रांतिकारक नारायणा गुरु यांच्या 170 व्या जयंती निमित्त “कही हम भूल ना जाये” या बसपाच्या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत रामेश्वरी रोडवरील नागपूर शहर बसपाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांचे अध्यक्षतेखाली, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे व लॉर्ड बुद्धाचे भैय्याजी खैरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण व मार्गदर्शन करून जयंती समारोप पार पडला.
बसपाकडे बाबासाहेबांनी दिलेला निळा झेंडा व त्यांची निशाणी हत्ती हे एकमेव शस्त्र आहे, तर कांशीरामजींनी सांगितलेला 108 वर्षाचा महापुरुषांच्या संघर्षाची गाथा व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असल्याने, स्थानिक निवडणुकीत फुले-शाहू- आंबेडकरी विचाराचा विजय निश्चित होईल असे बसपा नेते उत्तम शेवडे यांनी भाकीत व्यक्त केले.
याप्रसंगी चंद्रशेखर कांबळे यांनी नारायण गुरूंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर भैय्याजी खैरकर यांनी रिपब्लिकन नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे आंबेडकरी समाजाला बसपा शिवाय पर्याय नसल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी एड मुकेश मेश्राम, संगीत बाबु इंगळे, नितीन वंजारी, स्वप्नील ढवळे यांनी नारायण गुरु यांच्या जीवनावर व वर्तमान राजनीतीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षिण नागपूर विधानसभेचे सचिव सुमित जांभुळकर यांनी तर समारोप बी व्ही एफ चे सुनील पाटील यांनी केला. कार्यक्रमाला प्रामुख्याने अभय डोंगरे, हेमंत बोरकर, अरुण शेवडे, विनोद मेश्राम, कुंभारे आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.