spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा 25 सप्टेंबरपासून शुभारंभ

· नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान

· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

मुंबई :- डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांसाठी सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत २५ सप्टेंबर 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) येथे ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातून देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती महिना (CSAM) 2025 राबविण्यात येणार आहे.

या अभियानाचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, तसेच गृहमंत्रालय, क्रेट-इन (CERT-In), सेबी (SEBI) आणि बीएसई (BSE) यांचे मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

हे अभियान गृह मंत्रालयाच्या इंडिया सायबरक्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, क्रेट-इन (CERT-In) यांच्या सहकार्याने राबवले जात असून, उद्योगक्षेत्रातील भागीदार संस्थांनी या उपक्रमात योगदान दिले आहे.

हे अभियान नागरिक, संस्था व भागधारकांना सायबर सुरक्षिततेच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास, सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर, वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाईल आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.