– अध्यक्षपदी विशाल मग्गीडवार उपाध्यक्ष निखिल बेले सचिव नितीन बाराहाते कोषाध्यक्ष सुरज बंडीवार यांची निवड
पांढरकवडा :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून केळापूर तालुका प्रेस क्लब (पांढरकवडा ) दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारणीची निवड दि.६ जानेवारी २०२६ रोजी विश्राम गृह पांढरकवडा येथे सर्वानुमते गठीत करण्यात आली. केळापूर तालुका प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशिष बडवे, युनुस शेख, गणेश अनमुलवार, अध्यक्ष सुबोध काळपांडे यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच केळापूर तालुका प्रेस क्लबची सन २०२६-२७ या वर्षाकरिता नवीन कार्यकारण्याची निवड करण्यात आली. सदर कार्यकारणी मध्ये केळापूर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विशाल मग्गीडवार, उपाध्यक्षपदी निखिल बेले, सचिव पदी नितीन बाराहाते व कोषाध्यक्ष पदी सुरज बंडीवार यांची एकमताने निवड करण्यात आली. ज्येष्ठ सल्लागार म्हणून आशिष बडवे, युनुस शेख, सुबोध काळपांडे, गणेश अनमुलवार तर सदस्य पदाकरिता अतिक शेख, सुरज चौधरी, सागर मुळे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. केळापूर तालुका प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशिष बडवे,माजी अध्यक्ष सुबोध काळपांडे, युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवनिर्वाचित कार्यकारणीचे अध्यक्ष विशाल मग्गीडवार यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव नितीन बाराहाते यांनी केले.



