नागपुर २४ : दिनांक २२/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक २३/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये दिपक अग्रवाल, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपुर यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत जुनी वस्ती आणि सातगाव येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले आणि एम.आय.डी.सी. चौक येथे नाकाबंदी केली. पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी बोरी अंतर्गत गंगापुर झोपडपट्टी येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले
आणि गार्डन चौक येथे नाकाबंदी केली. सदर कोबिंग ऑपरेशन दिपक अग्रवाल यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन चे अधिकारी/अंमलदार हजर होते.


