spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरसेवक नाही… जनसेवक योगेश उर्फ गोलु कर्णेवार यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. येत्या १७ नोहेंबर पर्यत उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे विविध पक्षाकडून मुलाखती घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष स्व पक्षाचा विजयाची क्षमता असणारा कार्यकर्ता किंवा निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्याच्या मानसिकतेत आहे. मागील पंचवार्षिक मध्ये प्रभाग क्रमांक ५ मधुन युवा चेहरा म्हणून योगेश उर्फ गोलु माधव कर्णेवार यांनी खेताणी फाउंडेशनच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढविली होती व मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. व खेताणी फाउंडेशनच्या कार्यकाळात त्यांनी बांधकाम सभापती पदही भुषविले. आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीचे चित्र वेगळे असून खेताणी फाउंडेशन गट हे शिवसेना (शिंदे) गटाकडून निवडणूक लढविणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मधून माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती योगेश उर्फ गोलु कर्णेवार यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. नगरसेवक नाही…जनसेवक’, ‘आपला माणूस,’आपल्या हक्काचा माणूस गोलु कर्णेवारच उमेदवार हवा अशी मागणी प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांमधून होऊ लागली आहे. मागील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक कार्यकाळात नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले योगेश उर्फ गोलु कर्णेवार यांनी प्रभागातील नागरी सुविधा, पाणी, स्वच्छता रस्ते या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती.

खेताणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सलीमभाई खेताणी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली प्रभाग ५ मध्ये योगेश उर्फ गोलु कर्णेवार यांची जनसंपर्क मोहीम जोरदार गतीने सुरू आहे. शिंपी समाजाचा युवा चेहरा म्हणून समाजही त्यांचा पाठीशी भक्कमपणे उभा असून घराघरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात त्यांची पुन्हा दमदार एन्ट्री निश्चित मानली जात आहे. जनतेशी थेट संवाद, प्रभागातील प्रश्नांवर नेमकी भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे गोलु कर्णेवार यांचे नाव पुन्हा एकदा “जनतेचा नगरसेवक” म्हणून पुढे येत आहे.

Popular Articles