spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

देसी कट्टा व काडतूसासह कुख्यात गुन्हेगार सूरज ब्राह्मने अटकेत

 

नागपूर २२ : नागपूर शहरातील कुख्यात गुन्हेगार सूरज ब्राह्मने याला तहसील पोलिसांनी देसी कट्टा आणि जिवंत काडतूसासह अटक केली आहे. ठक्कर ग्राम परिसरातील दादरा पुलाजवळ रेल्वे पटरीजवळ तो शस्त्रासह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेवेळी सूरजकडे एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळले. प्राथमिक चौकशीत त्याने हे शस्त्र रायपूर येथून आणल्याचे कबूल केले आहे. सूरज ब्राह्मने याच्या विरोधात यापूर्वी MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) अंतर्गत दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. त्याला तडीपारही करण्यात आले होते.

सध्या तहसील पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सूरज ब्राह्मनेचा पूर्वेतिहास लक्षात घेता, त्याच्यावर आणखी गंभीर गुन्हे उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.