महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियमन) नियम 2025 वर हरकती व सुचना आमंत्रित

0
81

 

गडचिरोली, दि. २१ : महाराष्ट्र शासनाने बाल कामगार (प्रतिबंध व विनियमन) नियम 2025 संदर्भातील प्राथमिक अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेची प्रत गडचिरोली येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील सुचनाफलकावर नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, सदर नियमांविषयी कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला हरकती अथवा सुचना मांडावयाच्या असल्यास त्या अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत शासनाकडे पाठविता येणार आहेत. प्राप्त झालेल्या आक्षेप व सुचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

यासंदर्भात हरकती व सुचना पाठवायचे पत्ता असा आहे :

कामगार आयुक्त, कामगार भवन, ई-ब्लॉक, सी-20, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051.

नागरिक, संस्था आणि संबंधित घटकांनी या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या हरकती व सुचना वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन गडचिरोली येथील सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

@filephoto