spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कांद्री (कन्हान) नगरविकास आघाडीची अधिकृत गटस्थापना

– अतुल हजारे गटनेते, तर शिवशंकर चकोले उपनेते

कन्हान :- जिल्हाधिकारी मा विपिनजी इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपचायत कांद्री (कन्हान) नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविकांच्या बहुमताने ‘कांद्री (कन्हान) नगरविकास आघाडी’ नव्या राजकीय गटाची अधिकृत स्थापना करून बहु मताने अतुल रमेश हजारे यांची नवगठित आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. आणि शिवशंकर (शिवा) राम चकोले यांची उपनेतेपदी, तर बंटी सरोदे यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली .

गुरुवार (दि.०८) जानेवारी २०२६ ला जिल्हा धिकारी कार्यालय नागपुर येथे नगरपंचायत कांद्री येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविकांच्या बहुमताने ‘कांद्री (कन्हान) नगरविकास आघाडी’ या नव्या राजकीय गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी मा विपिनजी इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गटस्थापना पार पडली.

यावेळी बहुमताने अतुल रमेश हजारे यांची नवगठित आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. तसेच  शिवशंकरजी (शिवा) रामभाऊ चकोले यांची उपनेतेपदी, तर बंटी सरोदे यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. या महत्त्वपुर्ण प्रसंगी नवनिर्वा चित नगराध्यक्ष  सुजित डोमाजी पानतावणे यांच्या सह नगरसेवक चंद्रपाल कश्यप, उमेश वाडीभस्मे, सिताराम नाटकर, राकेश लांजेवार तसेच नगरसेविका मिनाक्षी भुते, सविता राऊत, माधुरी मस्के, आरती कोतपल्लीवार, रिता मस्के, संघमित्रा डोंगरे, रोशनी गजभिये यांनी बहुमताने सहभाग नोंदविला.याशिवाय नरहरी पोटभरे, रविंद्र कोतपल्लीवार, अतुल गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कांद्री नगरपंचाय तीच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मूलभुत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्याचा संकल्प नवगठित आघा डीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या गटस्थापनेमुळे कांद्री नगरपंचायतीच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असुन येत्या काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular Articles