spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मॉयल कामगार संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ

खापा :- गुमगाव खाण येथील मॉयल कामगार संघटना खापा शाखेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ मोठ्या उत्साहात आणि सन्माननीय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुकुंद जांबुलकर यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून रामअवतार देवांगण (सरचिटणीस) उपस्थित होते.

समारंभास मॉयल कामगार संघटनेचे खापा शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र डोंगरे, सचिव अन्वर अली, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लोमेश भगत, केंद्रीय उपाध्यक्ष विजय कठौते, कार्याध्यक्ष अनुप सोना, सुनील पटेल, लीलाधर जिभे, सुदर्शन कठौते, प्रशांत पवार, रणजित रौतिया, भुषण खुरसंगे, छोटेलाल कठौते, शुभम दियेवार आदी उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे समर्थक सभासद मनोज शेंडे, श्रावण मलवे, संजय शेंडे, नितेश गजभिये, रवींद्र गजभिये, दिनबंधू नायक, सुरेश शेंडे, ललिता दिनकर, ममता मणिलाल, अनिता हजारे, राखी सुभाष, व वंदना धनराज यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे व निष्ठेने संस्थेची सेवा करण्याची शपथ घेतली. हा कार्यक्रम केवळ औपचारिक शपथविधी सोहळा नव्हता, तर संघटनेच्या एकात्मतेचे, शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीकही होता.

Popular Articles