spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पालक सभा संपन्न, प्राध्यापकांनी केले पालकांनी मांडलेल्या अडचणीचे निराकरण

खापा :- स्थानिक जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय येथे वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक सभा शुक्रवारला (९ जानेवारी) आयोजित करण्यात आलेली होती. या पालक सभेला अध्यक्ष म्हणून प्राचार्य सुधाकर गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून तेजरामजी बावणे, मयुरी धुवाधप्पार उपस्थित होते. सर्व पालकांचे स्वागत गीत आणि व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन करून खऱ्या अर्थाने पालक सभेला सुरुवात करण्यात आलेली होती. सभेचे प्रास्ताविक प्राध्यापक देवेंद्र धुंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका वर्षा सेलोकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पंकज बावनकर यांनी केले.

यावेळी पालक ठोकणे, खंडाळ, मिश्रा, लिखाण, निस्ताने, कविता ढोबळे, तोंडरे, मनवटे, गबने, सुकन्या झाडे, लव्हारे लोणकर , खंडाते, सुनील गडे, प्रमोद सुरज पायरे, लक्ष्मण शेंद्रे, संतोष सोमकुवर, जयपाल शेंडे, रमेश तराळे, गिरधर गोहने आदी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पालकांनी सामंजस्य पूर्ण चर्चा केली. पालकांनी मांडलेल्या समस्या व आपल्या पाल्याप्रतीच्या अडचणीचे निराकरण प्राध्यापक वर्गांनी केले.

प्राध्यापक देवेंद्र धुंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचीआजपर्यंतची वाटचाल व खडतर संघर्ष पालकांपुढे मांडला. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आजपर्यंत अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कसे कार्यरत होत गेले हेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. प्राचार्य गजभिये यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांची व शिक्षकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे समजावून दिले. प्राध्यापक बावनकर व प्राध्यापिका सेलोकर, प्राध्यापक गजभिये यांनी आपल्या विषयातील समस्या व मुलांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या.

पालकांनी खऱ्या अर्थाने आमच्या पाल्यांच्या जडणघडणीमध्ये या महाविद्यालयाचे योगदान असल्याचे समाधान व्यक्त केले. आपल्या पाल्यांकडे संस्कारक्षम व अभ्यासपूर्ण असे लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासनही यावेळी अनेक पालकांकडून या पालक सभेत देण्यात आले. मोठ्या उत्साहात आनंद दैवातावरणात वैचारिक पद्धतीने चर्चा विनिमय या पालकसभेत करण्यात आलेला होता.

Popular Articles