spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एक परिवार एक झाड़ अभियानाला प्रारंभ

कामठी :- पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि भावी पिढ़ीसाठी हरित महाराष्ट्र निर्माण करण्या च्या उद्देशाने पी एंड टी कॉलोनी रनाळा येथे डॉक्टर विनायक गडेकर यांच्या वाढदिवस निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासन,वन विभाग आणि जनता यांच्यात सेतु म्हणून कार्य करत वृक्षारोपणा संदेश घराघरात पोहचवणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ.विनायक गडेकर यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या 300 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाला जनसहभागातून गती देणे प्रत्येक कुटुंबात निसर्गाविषयी कृतज्ञता व जबाबदारीची भावना निर्माण करने, वृक्ष सवंर्धनाला सामाजिक चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. विनायक गडेकर यानी केले.

या प्रसंगी अनिल आगरे,उज्वल रायबोले,संजय दोसेटवार,सुनील भालकर,सुबोध चांदोरकर,दशरथ भनारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles