Home Latest News विद्यापीठात ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ जनजागृती कार्यक्रम

विद्यापीठात ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ जनजागृती कार्यक्रम

0
90

– पदव्युत्तर समाजकार्य (समाज शास्त्र) विभागाचे आयोजन

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजकार्य (समाज शास्त्र) विभागात ‘अवयव दान श्रेष्ठ दान’ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मोहन फाउंडेशनच्या मदतीने मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी पडलेल्या कार्यक्रमात अवयव दाना बाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले. समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर, प्रमुख व्यक्ते म्हणून मोहन फाउंडेशनचे राजदूत देवान्ग छाया, प्रकल्प निर्देशीका वीणा वाथोळे यांची उपस्थिती होती. मानव विद्यान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी समुदायात होणाऱ्या वाहतूक अपघातामुळे अनेक लोग मृत्यूमुखी पडतात, अश्या मृत्यूमुखाच्या दारात असताना नवीन तांत्रिक आरोग्य उपकारणाच्या उपलब्धतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे अवयव दान करणे सोपे झाले आहे. त्याकरिता समाजातील बहुसंख्याक लोकांना मृत्यूपश्चात ही शारीरिक अवयव दान करून दुसऱ्या गरजू लोकांच्या मानवी शरीरात मृत्यू नंतरही जीवंत राहता येऊ शकतो, असे सांगितले.

समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर यांनी मनुष्यप्राणी आपल्या वेगवेगळ्या शारीरिक अवयवांचे दान करण्यास स्वतः च्या शरीराची जास्तीतजास्त काळजी घेणे गरजेचे आहे. हल्लीकाळच्या काळात आपल्याला अनेक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध होतात, त्यामुळे नवजात बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण देण्यात येते आणि म्हणूनच आपण एक सुधृढ आरोग्य जगत आहोत. आपण समाजशास्त्र, समाज कार्याचे विद्यार्थी असल्यास समाजात अवयव दानाचे महत्व लोकांना सांगण्याचे आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज झालेली आहे, असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ते म्हणून मोहन फाउंडेशनचे राजदूत देवान्ग छाया, प्रकल्प निर्देशीका वीणा वाथोळे यांनी ‘आयुष्यानंतर आयुष्याची भेट’ या ब्रीदवाक्यानी कार्यक्रमाला प्रारंभ केला. देवान्ग छाया यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताना कोण-कोणते मानवी शरीरातील अवयव जीवंत असताना आणि मेंदू मृत्यझाल्यावर दान करता येतात याविषयी माहिती दिली. अवयवदानाचे दोन प्रकार आहेत. जीवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान ज्याला Living Donor Organ Donation म्हणतात‌ आणि ब्रेन डेड, मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान याला Deceased Donor Organ Donation असं म्हटलं जातं. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, जीवंत असताना आपण एक किडनी (Kidney), पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाचा तुकडा (Pancreases) आणि यकृताचा (Liver) एक छोटा भाग दान करू शकतो.

स्वादुपिंडाचा छोटा तुकडा कापल्यानंतरही स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत सुरू राहाते. तज्ज्ञांच्या मते, यकृत असा एकमेव अवयव आहे, ज्याचा भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीनंतर तो पुन्हा वाढतो. अवयवदाता आणि रुग्ण दोघांच्या शरीरात यकृताचा भाग हळूहळू वाढत जातो. नेत्रदान करताना पूर्ण डोळा काढण्यात येत नाही तर निव्वळ कोर्निया काढून दुसऱ्याला ते लावण्यात येते. जसे मोबाईलला प्लास्टिकचे कवर लावल्या जातो तसंच. जीवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक (Near Related Donors) आणि Non-near relative donors किंवा सोप्या भाषेत लांबचे नातेवाईक असे दोन प्रकार आहेत. अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये- पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि नातू किंवा नात यांचा समावेश होतो.

Non-near relative donors मध्ये काका, मामा, त्यांची मुलं येतात. हे अवयवदाते गरजू व्यक्तीवरचं प्रेम किंवा आत्मियता असल्यामुळे अवयवदान करू शकतात. रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या कुटुंबाला याबाबत डॉक्टर माहिती देतात आणि त्यानंतर, अवयवदान प्रक्रियेबाबत माहिती दिली जाते. मेंदू मृत झालेला व्यक्ती दोन किडनी, यकृत, स्वादुपिंड, फफ्फुस, हृदय, आतडं, डोळे आणि टिश्यूचं दान करून ६ ते ९ गरजूंचे प्राण वाचवू शकतो.

नागपूरच्या झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीच्या को-ऑर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी ब्रेन डेथबाबत अधिक माहिती देतात. “ब्रेन स्टेम डेथ म्हणजे, स्टेमचं कार्य बंद होणं. ही एक अपरिवर्तनीय स्थिती आहे. ज्यात व्यक्तीचा मृत्यू होतो.” भारतात याला ब्रेन डेथ म्हणतात. ब्रेन स्टेम डेड व्यक्ती श्वास स्वत: श्वास घेऊ शकत नाही. समाजात अवयवाची मागणी लक्षात घेता समाजात लोकांना जागृत करण्याची गरज आहे. त्या करिता सोबतच अवयव दान करण्याच्या पद्धती कश्या स्वरूपाच्या आहेत, त्याची प्रक्रिया कशी करायची वेबसाईटला भेट देऊन प्रमाणपत्र प्राप्त करता येतो. या विषयी कार्यक्रमातील मुलांना महत्वाची माहिती देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन डॉ. सदाफ खान यांनी केले तर आभार डॉ. नितीन कायरकर यांनी मानले. कार्यक्रमाला एकूण ६० विद्यार्थी उपस्थित होते, तसेच समाजशास्त्र समाजकार्य विभागातील डॉ. प्रियंका अंबादे, डॉ. पूनम निमजे, डॉ. पायल चमटकर, प्रशांशा खांडेकर, विलास सूर्यवंशी, प्रीव्हेल सोमकुवर, प्रिन्स गणवीर, कौस्तुभ चुटे, किरण शेंडे, रजत मेश्राम, तृप्ती गणवीर आदिही प्रामुख्याने उपस्थित होते.