spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन; गुणवंत बालकलावंतांना मिळणार मोठे व्यासपीठ

नागपूर :- मोरया फाउंडेशनच्या वतीने बालकलावंतांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी “चिल्ड्रन डान्स कॉन्टेस्ट” या भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ जुलै (शनिवार) रोजी दुपारी १२ वाजता पासून समाज भवन, हनुमान मंदिर, अमरनगर, चिकली का राजा रोड, नागपूर येथे होणार आहे. स्पर्धा सोलो व ड्युएट अशा दोन प्रकारांत होणार असून, ५ ते ९ वर्षे आणि १० ते १५ वर्षे अशा दोन वयोगटांतील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य (Entry Free) ठेवण्यात आला आहे. या उपक्रमामागील उद्देश लहान मुलांमधील नृत्यकलेला प्रोत्साहन देणे, त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे आणि त्यांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेचे आयोजन मोरया फाउंडेशनच्या संस्थापक व सचिव रजनी अविनाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.