spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील देवलापार येथे चौकसे कॉलनीत महिला दिनानिमित्य विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परीषद सदस्या शांता कुमरे, प्रमुख पाहूणे ग्रामपंचायत सदस्या प्रणाली सरोदे, करवाहीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा निघोट, देवलापारच्या पोलीस उपनिरिक्षक वर्षा गायकवाड, पोलीस कर्मचारी दिपिका पारखी उपस्थीत होत्या. कार्यक्रमानिमित्य येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक रोशनी पारखी यांनी तर द्वितीय क्रमांक विप्रा वरकडे यांनी मिळविला. फुगा गेम मध्ये रेखा शेंडे, सिमा जोनपुरे, दिपिका साठे, योगीता येमसे, पुष्पा निघोट, मंगला मोरे यानी विविध क्रमांक पटकाविले. तर लिंबू चमचा स्पर्धेत भाग्यश्री वैरागडे यांनी क्रमांक पटकाविला. कार्यक्रम आयोजनासाठी मंगला गोरडे, वंदना वरकडे, मोनिका गोरडे, सिमा जौनपूरकर, नितू राजपाल,अनिता मानकर,पुजा चोले, शकुंतला कोडापे, प्रिती शुक्ला, चैती शिवने निलम बिसेन आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका कोडापे यांनी केले. आभार प्रदर्शन दिव्या वरखडे यांनी केले.

Popular Articles