नागपूर :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन त्याग धैर्य बलिदान आणि सामाजिक समस्येचा प्रसार प्रचारासाठी प्रेरणादायी कार्यक्रम शनिवार दिनांक ३ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता दीक्षाभूमी परिसरातील सभागृहांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीक्षाभूमीचे विलास गजघाटे, प्रमुख अतिथी डॉ. प्रा. भिक्खू सम्यक बोधी भिक्खू विनय भिक्खू महातिस्स दिनेश वैरागडे डॉ. दिगंबर मेश्राम भिख्युनी विशाखा भिख्युनी धम्मशिला आणि महिला अनिता मोरघडे उपस्थित होते.

डॉ. भिक्खू सम्येक बोधी यांच्या मते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन धैर्य आणि मानवी समस्येचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायी स्वरूपाचे ठरते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचा मार्ग खुला केला. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महिला मजूर सोनी देवी, निर्झरी साकेत, शामकला आगरीया, संत्रा देवी आणि अनिता लोहकरे यांच्यासह दीक्षाभूमीवर कार्यरत अकरा महिला कामगारांच्या शाल श्रीफळ आणि साठीचोळी देऊन त्यांना गौरान्विंत आले. या कार्यक्रमाचे संचालन शरद मेश्राम तर प्रस्तावना विशाल शुक्ला आणि आभार सुनील भोसले यांनी मानले. याप्रसंगी देवाजी रंगारी, मिलिंद थुल, संजीव मोरे, राम बागडे, सुरेश मून, सुरेश वानखेडे, नितीन बनसोड, दिपाली रामटेके, सुनीता बोरकर, मंगला हुमने, स्वाती मेश्राम आणि बौद्ध भिखयुनी व आंबेडकरी अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते.




