नागलवाडी जिल्हा परिषद शाळेत पालक सभा व निरोप समारंभ

0
35

खापा, वार्ताहर :- जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा, नागलवाडी येथे नुकतीच पालक सभा संपन्न झाली. याप्रसंगी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमावर चर्चा करण्यात आली. पालक सभेत शाळेने वर्षभऱ्यात केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या पालक सभेला सत्तर पेक्षा अधिक महिला पालकांनी सहभाग घेतला.

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेकाम तर प्रमूख अतिथी म्हणून सरपंच दिपाली ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक प्रभू कारोकार यांनी तर आभार शिक्षीका इंदिरा सिरसाम यांनी मानले.