spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती सभा

– दहा प्रस्तावावर चर्चा करुन ठराव पास

हंसराज,भंडारा :- पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदिपकुमार गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. सभेला स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिप्ती डोकरीमारे, कायदेविषयक सल्लागार ॲड. विनोद भोले, क्ष-किरण तज्ञ डॉ. विरेंद्र कुकडे, सामाजिक कार्यकर्त्या तथा युवा सरल असोशिएशनच्या जिल्हा समन्वयक मृणाल मुनिश्वर, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका उंबारकर आदी उपस्थित होते.

यावेळी एकूण 10 प्रस्ताव प्राप्त झाले होते. सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा करुन ठराव पास करण्यात आला. गर्भलिंग परिक्षण करुन भृण मुलगी असल्यास तिला गर्भातच मारले जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. गर्भलिंग परिक्षण करण्यास प्रवृत्त करणे, प्रेरित करणे व अशा कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दर्शविणे, मदत करणे देखील कायद्याने गंभीर गुन्हा आहे. आपल्या कार्यक्षेत्रात जर कोणाला शंका आली की, सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टरकडून कायद्याचा भंग होत असेल तर त्याबाबतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख रुपये पारितोषिक म्हणून ठेवण्यात आले आहे. सदर माहिती खरी ठरल्यानंतर व न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर सदर पारितोषिक देण्यात येईल. सदर खबर देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्यास हेल्पलाईन क्रमांक 18002334475, टोल फ्री नंबर 104, वेबसाईट https//.amchimulgi.maha.in यावर तक्रार नोंदवावी, असेही स्पष्‍ट करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.