spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा घरगणना आजपासून सुरु

– घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी  

हंसराज,भंडारा :- जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) हा दिनांक 16 मे ते 15 जून 2026 दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या घरी आलेल्या प्रगणकाला अचुक माहिती देण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

त्याआधी स्वयं-गणना (Self-Enumeration) टप्पा 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडला आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल अॅप “Census 2027-HLO” तसेच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना 2027 प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील जनगणना विषयक कामासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी विविध घटकांशी संवाद साधला. प्रत्येक गावातील व शहरातील नागरिकांची जनगणना झाली पाहिजे यासाठी जनगणनेच्या या राष्ट्रीय उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.