spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गावाच्या शाश्वत विकासाठी लोकचळवळ महत्वाची – सतीश घारड

– टेकाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान विशेष ग्रामसभा संपन्न 

कन्हान :- गावांमध्ये ग्रामपंचायती अधिक सक्षम व्हाव्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून त्यांची कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाच्या सुचणे नुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान विशेष ग्राम सभा बुधवार 17 सप्टेंबर रोजी ग्राम पंचायत टेकाडी (को. ख.) येथे संपन्न झाली.गावांमध्ये शिक्षण,आरोग्य, रोजगार,रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, वृक्षारोपन, मुलभूत गरजांसह,रोजगार या माध्यमाने गवातील शेवटच्या घटकासह गावाच्या सामाजिक,आर्थिक आणि शाश्वत विकास करण्यासाठी गावातील लोकांचा सहभागातून लोकचळवळ उभारने महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसभा अध्यक्ष सतिश घारड यांनी यावेळी केले.

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीपर्यंत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे, अभियानात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसंपन्न, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर सात कलमी कार्यक्रम राज्य शासनाने आखून दिल्या प्रमाणे ग्राम पंचायतील कार्य करायचे आहे,ज्याचे गुणांणूक्रमांनुसार ग्राम पंचायतील रोख पारितोषिके देखील राज्य शासनाच्या वतीने बहाल झालेली आहेत.अभियानाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.ग्रामसभेला ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री यांनी अभियानाबद्दल संबोधन केले, त्यानंतर विशेष ग्राम सभेला सुरुवात करण्यात आली.सभेला अध्यक्ष पदी ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड सोबत ग्राम पंचायत सदस्य बाळू गजबे, अर्चना वासाडे, तारकेश्वरी मोरे, शीतल सातपैशे, मीना झोड, पायल झोड प्रभारी सचिव रिया फरकाडे, प्रभारी तलाठी अनिकेत दिवटे, पोलीस पाटील पुंडलिक कुरटकर यांचे सह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.संचालन विलास सावरकर यांनी तर आभार मनोज मोहाडे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.