नागपूरमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन: जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

0
51

नागपूर २५ : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि जिल्ह्यात रात्री उशिरा कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. या मोहिमेचा भाग म्हणून खापरखेडा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या टोळीवर आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली.

खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव रंगारी येथील दर्शनवाडी लॉनमध्ये काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्वरित छापा टाकला. अंधाराचा फायदा घेत काही जुगारी घटनास्थळावरून फरार झाले, मात्र तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन मोबाईल फोन, सात वाहने आणि ₹18,000 रोख रक्कम जप्त केली. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹6.93 लाख इतकी आहे. त्याचबरोबर, कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी वॉर्ड क्रमांक ३, खापरखेडा येथून बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक केली. आरोपीकडून अंदाजे ₹4,000 किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांचे असे कोम्बिंग ऑपरेशन्स सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.