spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज फार्म हाउस येथील जुगार अड्यावर पोलीसाची धाड

– ९ आरोपी अटक, ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : – पोलीसांच्या डीबी पथकाने मौजा जुनी कामठी शिवारातील राज फार्म हाउस येथे सुरु अस लेल्या जुगार अड्यावर धाड टाकुन नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार (दि.१४) सप्टेंबर ला दुपार दरम्यान कन्हान पोलीस डीबी पथक पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन जुनी कामठी शिवारातील राज फार्म हाउस येथे झाडाखाली सावलीत खुल्या जागेत काही इसम ५२ ताशपत्यावर पैश्याची बाजी लाऊन हारजीत चा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलीसांनी सापळा रचुन धाड टाकली असता आरोपी अरविंद कमल उईके (३०), अमर कमल उईके (३२), जितेंद्र देवराव बारापात्रे (३५), सुमित वामणराव दुनेदार (३६), दुर्गेश गणेश निमजे (३०), सतीश नत्थु कांबळे (४२), भरत प्रल्हाद पिंपळघरे (३४), अमित चमनराव नंदनवार (३२), आशिष चमनराव नंदनवार (३२) सर्व रा. नागपुर असे नऊ इसम जुगार खेळतांना मिळुन आले. पोलीसांनी अंगझडतीत आणि डावावर लावलेले नगदी ५१७० रुपये, ६ मोबाइल किंमत ६५,००० रुपये आणि ५२ ताशपत्ते किंमत ५० रुपये असा एकुण ७०,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरी क्षक प्रविण हारगुडे, पोहवा हरिष सोनभद्रे, जयलाल सहारे, वैद्यनाथ तोटेवार सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

फाईल फोटो


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.