– ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव बरड येथे खुल्या जागेत ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या चौघांना कळमेश्वर पोलिसांनी बुधवारी (२ सप्टेंबर) रंगेहात पकडले. कारवाईत रोख ६ हजार २०० रुपये, चार मोबाईल व ५२ ताशपत्ते असा एकूण ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरगाव बरड येथे धा- टाकली असता आरोपी जुगार खेळताना आढळून आले.
अशोक उपासराव काळे (४०, रा. वॉर्ड क्र. २, बोरगाव, ता. कळमेश्वर), महेश लखन राऊत (२६, रा. वॉर्ड क्र. २, तोंडाखैरी ता. कळमेश्वर), शंकर मनोहर जाधव (३५, रा. वॉर्ड क्र. २, तोंडाखैरी ता. कळमेश्वर), नितेश लक्ष्मण पंडे (३७, रा. वॉर्ड क्र. २, बोरगाव बरड, कळमेश्वर) असे आरोपीचे नाव असून यांना ताब्यात घेतले. कळमेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार खेळविणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते, रोख ६,२०० रुपये आणि ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, असा एकूण ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात होत आहे.





