– ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल
– १ लाख ३५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त,
– कन्हान पोलिसांची मोठी कारवाई.
कन्हान :- पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, ताशपत्ते व इतर साहित्य असा एकुण १ लाख ३५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि.११) सप्टेंबर २०२६ रोजी रात्री कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्त्यांवर पैशांचा जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकुन कारवाई केली. यावेळी रोशन उर्फ सोनु रामु यादव (३६), चंकी राजेंद्र सहारे (२९), अजय भाऊराव पडघणे (३९), विक्की पंजावर कोमटे (३१), आकाश गजानन जाधव (२८), सौरभ पंजाबरा व वासे (२७), नितेश मुन्नालाल राठोड (३०), सुधाकर अनवरसिंग खडसे (४८), प्रिंस देवशरण कश्यप (१९), हर्ष उमाकांत निशाद (१९), विशाल सुरज मेहता (३३) ,सचिन भिवाजी मारबते (४५), विनोद रामभाऊ चामट (४५), आदित्य अनिल भरणे (३४) आणि संजय भुवन मुरचुडे (४२) हे जुगार खेळताना आढळुन आले. पोलि सांनी पंचांसमक्ष आरोपींच्या ताब्यातुन ५२ ताशपत्ते, ३७ हजार रुपये रोख, ९८ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकुण १ लाख ३५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी १५ आरोपींविरुद्ध कलम १२, महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहायक पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक गौडा, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर पेंदोरे, हरिष सोनभ द्रे, अमित यादव, आकाश सिरसाट, आशिष बोरकर, वैजनाथ तोटेवार सह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.





