spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात राजकीय महानाट्य! ठाकचंद मुंगूसमारेंचा भाजपा प्रवेश अवघ्या काही मिनिटांतच रद्द

हंसराज, प्रतिनिधी भंडारा तुमसर :- भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मंगळवारी एक अभूतपूर्व आणि धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. अनेक पक्षांतर केलेले नेते ठाकचंद मुंगूसमारे यांचा भाजपात झालेला अधिकृत पक्षप्रवेश अवघ्या काही मिनिटांतच रद्द करण्याची नामुष्की ओढवली. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यस्तरावर ‘क्लीन वॉश’च्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत मुंगूसमारे यांनी नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, मुंगूसमारे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीची (अमलबजावणी संचालनालय) नोटीस मिळाल्याची चर्चा परिसरात होती. ‘ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हा पक्षप्रवेश आहे का?’ असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात असतानाच, आमदार फुके यांनी मुंगूसमारे यांचा प्रवेश रद्द केला. पक्षाची प्रतिमा आणि शिस्त लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या गोंधळानंतर ठाकचंद मुंगूसमारे यांनी एक स्पष्टीकरण पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आमच्याविरोधातील तक्रारी आणि ईडीशी संबंधित जुन्या प्रकरणांची माहिती फुके यांना मिळाल्याने त्यांनी तूर्तास पक्षप्रवेश रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्यावर कोणतीही कारवाई प्रलंबित नाही. हा प्रवेश ईडीच्या भीतीपोटी नसून केवळ राजकीय कारणांसाठी होता,” असा दावा त्यांनी या खुलाशात केला आहे.

Popular Articles