spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा ग्रंथोत्सवास आजपासून सुरुवात; शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळणार

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जकातदार विदयालयात दि.5 फेब्रुवारीपासून होणाऱ्या दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी व त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी सावनकुमार तसेच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.हे प्रदर्शन तीन दिवस असून या प्रदर्शनामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती, लाभ व अंमलबजावणी याबाबतची माहिती सचित्र स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या संयुक्त प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी केले आहे.

Popular Articles