spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहार तालुका प्रमुख प्रदीप निशाणे यांचे बेमुदत आमरण आंदोलन सुरू; जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांनी भेट घेत दिला पाठिंबा!

तिरोडा :- शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, दुर्बल आदी घटकांसाठी परिणामांची पर्वा न करता रस्त्यावर उतरणारा आणि परिणामी टोकाची भूमिका घेणारे प्रहारचे तालुका प्रमुख मा. प्रदीप निशाणे हे गेल्या चार दिवसांपासून मुंडिकोटा इथं बेमुदत आमरण उपोषण करता येत. बऱ्याच वर्षापासून क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व समस्यांसाठी ते लढा देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या रास्त मागण्याकरिता पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यासाठीच काल त्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष श्री रविकांत बोपचे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठींबा दिला आणि प्रकृतीची विचारपूस केली. यासह प्रमुख मागण्यांची दखल घेण्याकरिता प्रशासनातील अधिकाऱ्यांशी भ्रमध्वनीद्वारे संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यांची प्रकृती क्षीण होत असली तरी निर्धार मात्र ठाम आहे.

प्रशासनाने अधिक दिरंगाई न करता तातडीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा या आंदोलनाची धग अधिक वाढेल आणि त्याचे चटके प्रशासन सह सरकारला बसल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांनी व्यक्त केले.

यावेळी रविकांत बोपचे यांच्यासह महेश कुकडे, विनोद कुकडे, सुरेश गौधर्य, जॉनी सैय्यद, केतन रामटेके आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.