किशोर साहू: मौदा ,ता. ५: बुधवार (दि. 03 सप्टेंबर) ला झालेल्या तालुका स्तरीय कला उत्सव स्पर्धेत तालुक्यातील आजनगाव येथील प्रनाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या यशामुळे तालुक्यातून शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे
शाळेला मिळालेले हे यश विद्यार्थ्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आहे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी बाबुलकर यांनी केले .या यशामुळे प्रनाग हायस्कूलच्या नाव लौकिकात भर पडली असून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी अशीच कामगिरी करतील अशी आशा केले जात आहे.


